
सावरगाव ( प्रतिनिधी ) आज मंगळवार दिनांक 8/9/2026 रोजी शाडूमाती पासून पर्यावरण पूरक गणपती मूर्ति बनवण्याची कार्यशाळा नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय सावरगाव येथे आयोजित केली करण्यात आली. कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी विदयालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.मिलिंद श्रीवास्तव सर यांनी कार्यशाळा मार्गदर्शक कलाशिक्षक मा श्री.विजय चव्हाण सर यांचे स्वागत केले.मा .चव्हाण सर यांनी गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेऊन गणेश मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले. विद्यार्थी, विद्यार्थीनींनी श्री. चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाने गणेश मूर्ती बनवण्याचा अनुभव घेतला व सदर मूर्ती ते घरी स्थापित करणार आहेत.

सदर पर्यावरण पूरक गणेश मूर्ती पाण्यात विरघळून निसर्गाचे संरक्षण होते हा संदेश सदर कार्यशाळेतून विद्यार्थ्यां मार्फत घराघरात पोहोचविण्यात आला.सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

