
खेळाडूंनी संधीचा फायदा घेऊन प्रगती करावी – अशोक कदम, नगरसेवक ओझर नगरपालिका.

नाशिक दिनांक ८ सप्टेंबर : महाराष्ट्र थ्री अ सईड व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने आणि थ्री अ सईड फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलाच्या बंदिस्थ हॉलमध्ये २ ऱ्या राष्ट्रीय थ्री अ सईड व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १४ वर्षे मुले आई मुली आणि २१ वर्षे मुले आणि मुली अश्या चार गटांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतातील १६ राज्यांच्या संघांनी सहभाग नोंदवला.

यामध्ये यजमान महाराष्ट्र संघाबरोबर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छातीसगढ, चंदीगड, पंजाब, पॉंडिचेरी, दिव-दमण, गुजराथ, विदर्भ, दिल्ली,बिहार या राज्यांच्या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेचे उदघाटन नाशिक महानगर पालिकेचे नगरसेवक प्रवीण जाधव, ओझर नगरपालिकेचे नगरसेवक अधिक कदम, छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी थ्री अ सईड व्हॉलीबॉल फेडेरेशन ऑफ इंडियाचे आणि महाराष्ट्र थ्री अ सईड व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव मारुती हजारे आणि फेडेरेशनचे पदाधिकारी तथा महाराष्ट्र थ्री अ सईड व्हॉलीबॉल असोसिएशनचे पदाधिकारी तसेच विविध राज्यांचे सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते. खेळाडूंनी संचालन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी बोलतांना प्रमुख पाहुणे अशोक कदम यांनी सांगितले की, भारताच्या विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेळतील कौशल्याच्या माध्यमातून जिद्दीने खेळ करून आपल्या राज्याचे नांव उंचवावे.

नगरसेवक प्रशांत जाधव यांनीही खेळाडूंना शुभेच्छा देऊन या संधीचा फायदा घ्यावा असे सांगितले. थ्री अ सईड व्हॉलीबॉल फेडेरेशन ऑफ इंडियाचे आणि महाराष्ट्र थ्री अ सईड व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव मारुती हजारे यांनी या स्पर्धेच्या आयोजना मागील हेतू सांगितला. हा व्हॉलीबॉलच खेळ असून सहा खेळाडूंऐवजी तीन खेळाडू प्रत्यक्ष मैदानात खेळतात. बहुतेक नियम हे व्हॉलीबॉल सारखेच असून, तीन खेळाडूंच्या उपस्थितीमुळे नियमात काही बदल करण्यात आलेले आहेत असे सांगितले. खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी या संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून खेळाडूंना जास्तीत जास्त संधी निर्माण करण्याचा मनोदय आहे असे सांगितले.
या स्पर्धा प्रथम साखळी आणि नंतर बाद पद्धतीने खेळविल्या जात आहेत. अशी माहिती तांत्रिक समितीच्या वतीने देण्यात आली.

आज उद्घाटनानंतर खेळल्या गेलेल्या सामन्यात १४ वर्षे मुलीच्या गटात तेलंगणा संघाने उत्तम खेळ करून आपला पहिला विजय साजरा केला. तर १४ वर्षे मुलांमध्ये बिहार, विदर्भ तेलंगणा आणि कर्नाटक यांनी उत्तम कामगिरी करून आपले पहिले विजय साजरे केले. २१ वर्षे मुलांच्या गटात यजमान महाराष्ट्राच्या संघाने उत्तराखंड संघावर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत चांगली सुरवात केली.
आज झालेल्या सामन्यांचे निकाल :
१४ वर्षे मुले : १) विदर्भ विजय विरुद्ध छत्तीसगड २-०. २) कर्नाटक विजय विरुद्ध गुजराथ २-०
१४ वर्षे मुली : १) तेलंगणा विजय विरुद्ध विदर्भ २-१ , २) कर्नाटक विजय विरुद्ध महाराष्ट्र – २-०
२१ वर्षे मुले : १) दिल्ली विजयी विरुद्ध विदर्भ – २-०, २) आंध्र प्रदेश विजय विरुद्ध दिव – दमण २-०,
३) छत्तीसगड विजय विरुद्ध पॉंडेचरी – २-१, ४) महाराष्ट्र विजय विरुद्ध उत्तराखंड – २-०,
५) गुजराथ विजयी विरुद्ध मध्य प्रदेश – २-०.
फोटो : १) स्पर्धेचे बॉल मारून उदघाटन करतांना प्रमुख पाहुणे, प्रवीण जाधव, अशोक कदम, आनंद खरे, मारुती हजारे आदी.
२) स्पर्धेतील खेळतांनाचे चुरशीची क्षण.

