
सिन्नर (प्रतिनिधी)कोपरगाव येथील बी द चेंज फाउंडेशनच्या वृत्तीने येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026” ने शिर्डी येथील साई पालखी निवारा येथील कार्यक्रमात गौरविण्यात आले.सन्मानपत्र, सन्मानचित्र,शाल तसेच श्री साईबाबा प्रतिमा देऊन गौरविण्यात आले. अभिनेत्री निवेदिता पगार यांच्या हस्ते तसेच भारतीय लष्कराचे सेवानिवृत्त मेजर सुनील मोहोड, त्रिदल सैनिक संघ व सैनिक फेडरेशन नाशिक, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अरुण भंडारे,पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक निलेश घोडेचोर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ.श्यामसुंदर झळके यांनी गेल्या 40 वर्षांपासून सामाजिक, वैद्यकीय,शिक्षण,पत्रकारिता, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या विविधांगी कार्य कर्तृत्वाची दखल घेत त्यांना बी द चेंज फाऊंडेशन तर्फे सन्मानित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मयुर ढोकचौळे यांनी दिली.

