
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३९० वा दिवस

काही धर्मवेड्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजविले असून, कित्येकदा ही पृथ्वी नर रक्ताने न्हाऊन काढली आहे. अनेक संस्कृतींचा विध्वंस करून त्यांनी राष्ट्राची राष्ट्रे हताश करुन सोडली आहेत. हे भयंकर राक्षस नसते तर आज मानव समाज त्यापेक्षा कितीतरी अधिक उन्नत होऊन गेला असता. पण आता त्यांची घटिका भरली आहे आणि मला अशी उत्कट आशा वाटते की या धर्म परिषदेच्या सन्मानार्थ आज प्रातःसमयी निनादित झालेला घंटानाद समूळ धर्मवेडाची, धर्माच्या नावाखाली शास्त्राने वा लेखणीने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळाची आणि एकाच लक्ष्याकडे आपापल्या मार्गांनी जात असलेल्या व्यक्तीतील एकमेकांविषयीच्या असहिष्णुतेच्या समस्त भावनांची मृत्युघंटा ठरेल.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २० शके १९४८
★ श्रावण अमावस्या
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. ११ सप्टेंबर २०२६
★ १८९५ भूदान चळवळीचे प्रणेते, पहिले वैयक्तिक सत्याग्रही, भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचा जन्मदिन.
★ ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील “शिकागो” येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेतील विश्ववंद्य स्वामी विवेकानंदांच्या विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या क्रांतीकारी व्याख्यानास १३२ वर्ष पूर्ण होत आहेत.
★ विश्वबंधुत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

