
लासलगाव, ( प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाच्या वतीने भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर व श्री. सुभाष शिरसाट यांच्या हस्ते भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक, तत्त्वज्ञ व समाजसुधारक म्हणून परिचित आहेत. त्यांनी तत्कालीन समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना विरोध करून समता, मानवता व नैतिक मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस अवतारदिन म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमास रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनिल गायकर, श्री.सुभाष शिरसाट तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

