
सरस्वती विद्यालय येथे प्रा.अरुण बुंदेले यांची अभ्यासविषयक कार्यशाळा संपन्न
अमरावती( प्रतिनिधी )
स्व.बाबुरावजी वानखडे प्रणित ग्रामीण शिक्षण संस्था, काँग्रेस नगर अमरावती संचलित सरस्वती विद्यालय, विद्यापीठ काॅलनी, एम.आय.डी.सी.रोड, अमरावती येथे दि.१२ सप्टेंबर २०२६ रोजी कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,अमरावती अंतर्गत ‘आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला’ फेम आणि ‘ आदर्श अभ्यासाचे तंत्र’ या पुस्तकाचे लेखक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांची विद्यार्थ्यांच्या गुणवृद्धिसाठी “अभ्यास विषयक कार्यशाळा” दि.१२ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झाली.
प्रा.अरुण बुंदेले यांच्या या अभ्यास विषयक कार्यशाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री अभय अं. गादे सर होते तर प्रमुख अतिथी एन.एस. सत्पाळ मॅडम,ए.डी.पाटील मॅडम, ए.ए.बोबडे सर होते .
मा.श्री बाळासाहेब वानखडे,अध्यक्ष,ग्रामीण शिक्षण संस्था,अमरावती आणि मा.श्री शुभम बाळासाहेब वानखडे,सचिव, ग्रामीण शिक्षण संस्था, अमरावती यांनी या अभ्यास विषयक कार्यशाळेला ऑनलाइन शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी व कार्य शाळेचे प्रमुख प्रा.अरुण बुंदेले यांचा सविस्तर परिचय डी. एस.गंजीवाले सर यांनी करून दिला.
अभ्यासविषयक कार्यशाळेचे सादरीकरण करताना प्रा.अरुण बुंदेले म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी कोणत्याही वर्गातील कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना जिद्द व चिकाटीने केला पाहिजे. प्रत्येक विषयाचा अभ्यास समान केला पाहिजे. नियमित अभ्यासाचे आदर्श वेळापत्रक तयार करून अभ्यास केल्यास कोणताही विद्यार्थी गुणवंत होऊ शकतो.” असे विचार व्यक्त केले.
सादर करताना प्रा.अरुण बुंदेले यांनी ‘भद्याची माय’ही विनोदी एकांकिका सादर केली. या एकांकिकेत भद्याच्या मायची भूमिका स्त्री वेशात प्रा.अरुण बुंदेले यांनी केली तर भद्याची भूमिका चि. मानव बोंडे या वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांने केली.या एकांकिकेत प्रा. बुंदेले यांनी एका ग्रामीण भागातील मजुरी कारणारी आई भद्याला (आपल्या मुलाला )कबाडकष्ट करून कशाप्रकारे शिकविते आणि अभ्यास न करणारा भद्या कसा अभ्यास करायला लागतो आणि त्यात अभ्यास विषयक कसे परिवर्तन होते हे सांगण्याचा प्रयत्न वऱ्हाडी – विनोदी भाषेत केलेला आहे . “मी आता अभ्यास करणार” अशा प्रकारची शपथ सुद्धा भद्याने घेतलेली आहे.
या अभ्यासविषयक कार्यशाळेत विद्यार्थीप्रबोधन कर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी अभ्यास कसा करावा?,अभ्यास किती करावा?,विद्यार्थ्यांनी मनातून न्यूनगंड काढून आत्मविश्वास स्वतःमध्ये कसा निर्माण करावा?, वाचनाच्या प्रकारानुसार वाचन कसे करावे? मराठी वर्णमाला, वळणदार हस्ताक्षरांचे महत्त्व व नियम,शुद्धलेखनाचे महत्त्व व नियम,आदर्श उत्तरपत्रिका सोडवण्याची कला, इत्यादी अभ्यासविषयक कार्यशाळेतील विविध मुद्द्यांचे सादरीकरण प्रासादिक शैलीत करून विद्यार्थ्यांची मनं जिंकली.
” प्रा.बुंदेले यांची अभ्यास विषयक कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या गुणवृद्धीसाठी आवश्यक “
– मुख्याध्यापक अभय अं. गादे
" प्रा.बुंदेले यांची अभ्यास विषयक कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या गुणवृद्धीसाठी अतिशय आवश्यक असून ती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे.आमच्या विद्यार्थ्यांच्या मनात या कार्यशाळेमुळे निश्चितच अभ्यासाची प्रेरणा निर्माण होईल यात शंका नाही" असे विचार कार्यशाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री अभय गादे सर यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेचे संचलन आय.यू.निचळ मॅडम यांनी तर आभार एस.डब्यू.बेलसरे यांनी मानले.
याप्रसंगी ए.डी.पाटील मॅडम,एन.एस.सत्पाळ मॅडम, आर.यू.निचळ मॅडम,ए. ए. बोबडे सर,बी.पी.वर्मा सर, डी.एस.गंजीवाले सर,एम. व्ही.गव्हाणे सर,ए. आर. उमक्कार सर,एस. डब्ल्यू. बेलसरे सर बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

