
दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस जगभरात ‘जागतिक लोकशाही दिन’ (आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन – International Day of Democracy) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस समाजात लोकशाहीच्या तत्त्वांचा प्रसार करणे, मानवी हक्कांचे रक्षण करणे आणि नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो…
२००७ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने (UN General Assembly) १५ सप्टेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन’ म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. हा दिवस अधिकृतपणे २००८ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. आंतर-संसदीय संघाने (IPU) १५ सप्टेंबर १९९७ रोजी ‘लोकशाहीवरील सार्वत्रिक घोषणापत्र’ स्वीकारले होते, म्हणूनच हा दिवस निवडण्यात आला.
लोकशाही बळकट करणे: जगभरातील देशांमध्ये लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत करणे आणि ती शाश्वत ठेवण्यासाठी सरकारांना प्रोत्साहित करणे.
जनतेचा सहभाग: देशाच्या विकासात आणि निर्णय प्रक्रियेत सामान्य जनतेचा थेट सहभाग वाढवणे.
जागरूकता: मानवी हक्क, स्वातंत्र्य, समानता आणि सुशासन याबद्दल लोकांमध्ये सार्वजनिक जागरूकता निर्माण करणे.
सद्यस्थितीचा आढावा: हा दिवस जगातील लोकशाहीच्या सद्यस्थितीचे आणि आव्हानांचे मूल्यमापन करण्याची संधी देतो…
💡 भारताच्या संदर्भात महत्त्व
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकाचीशाही देश आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा आणि आपले सरकार निवडण्याचा समान अधिकार दिला आहे. त्यामुळे भारतात हा दिवस लोकशाही मूल्यांचे जतन करण्याची आणि नागरिकांच्या कर्तव्यांची आठवण करून देणारा मानला जातो…🙏

