
नांदगाव (नाशिक) : नांदगावच्या मातीचा सुगंध राष्ट्रीय पातळीवर पोहोचवत, येथील सुपुत्र आणिफुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा चालवणारे निर्भीड पत्रकार आयु. प्रज्ञानंद दयाराम जाधव यांना मानाचा ‘डॉ. भीमराव आंबेडकर समाज रत्न पुरस्कार – 2026’ ने सन्मानित करण्यात आले आहे.
उत्तराखंडमधील अल्मोरा येथील प्रतिष्ठित इंडियन हेल्थ आवरणेस असोसिएशन (IHAA)या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. समाजाच्या प्रत्येक न्याय हक्कासाठी अहोरात्र धावून जाऊन,पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय व निर्भीड कार्याची दखल घेऊन त्यांना दि. ७ सप्टेंबर २०२६रोजी हा राष्ट्रीय सन्मान बहाल करण्यात आला.कमी वयात हा मोठा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण नांदगाव, मनमाड आणि नाशिक जिल्ह्यासाठी हा भूषणावह क्षण आहे.

या राष्ट्रीय सन्मानाचा अभिमान म्हणून आज नांदगाव येथील आंबेडकरी अनुयायांनी त्यांचा हृदयस्पर्शी सत्कार केला.
या वेळी देविदास अण्णा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार ठेवण्यात आला होता आर.पी.आय. राजरत्न फाउंडेशन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा फाऊंडेशन, नांदगाव यांनी देखील या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रज्ञानंद जाधव यांना निळी टोपी,पंचशील शाॅल,निळी फीत,पुष्पहार आणि सन्मान केला.
आपल्या भावना व्यक्त करताना प्रज्ञानंद जाधव म्हणाले, “हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून, माझ्या लेखणीवर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या प्रत्येक समाज बांधवाचा आहे. माझी लेखणी नेहमीच तळागाळातील वंचितांच्या न्यायासाठी लढत राहील.” यावेळी त्यांनी सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार मानले.
या छोट्या खाणी कार्यक्रमाची उत्कृष्ट सूत्रसंचालन भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष मनोज चोपडे यांनी केले.याप्रसंगी आर.पी.आय.नेते रवींद्र गरुड,बाळासाहेब पवार, राजू गुढेकर,विलास चव्हाण, सोनू पेवाल,राज पेवाल,रघुनाथ जगताप, मनमाडचे शिरीष भाई पगारे, महेंद्र (बापू) वाघ,मा. सरपंच शिरिष उशिरे (पिंप्राळे),छोटू पवार,अशोक बोराळे, मुकेश बेग यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार प्रज्ञानंद जाधव यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

