
पुरुषोत्तम च्या राजाचे विसर्जन करताना शालेय समिती अध्यक्ष रावसाहेब गायधनी प्राचार्य उमाकांत वाकलकर पर्यवेक्षक डॉ. गजानन होडे शिक्षक वृंद व विद्यार्थी
नाशिक रोड -( प्रतिनिधी )नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय येथे पुरुषोत्तमच्या राजाचे पर्यावरणपूरक शाळेच्या प्रांगणात विसर्जन करण्यात आले.
शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमितपणे साजरा केला जात असून शाडू मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना व सजावट करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
या विसर्जन सोहळ्याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष, रावसाहेब गायधनी, प्राचार्य उमाकांत वाकलकर, पर्यवेक्षक गजानन होडे, सांस्कृतिक प्रमुख संगीता मालपाठक, शालेय पंतप्रधान अथर्व सरोदे तसेच शिक्षक प्रतिनिधी शरद लोहार, सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद देण्यात आला.

