
प्रकाश सांबरे,अंदरसूल: चालते फिरते वाचनालय चे संस्थापक समाजसेवक संतोष पुंड यांचा सन्मान करताना नाशिक जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे जेष्ठ पत्रकार प्रकाशभाऊ साबरे सेवानिवृत मुख्याध्यापक चळवळीतील कार्यकर्ते नानासाहेब पटाईत सत्यशोधक चळवळीचे भगवान चित्ते सत्यशोधक चळवळीचे किशोर जाधव शिवसेनेचे नेते भगिनाथ थोरात सेवानिवृत मुख्याध्यापक पंडित मेहकर सर राणवरे सर बबनराव वाघ आदी
अंदरसूल (प्रकाश साबरे) अंदरसूल येथील चालते फिरते वाचनालय कोणत्याही अनुदानाची मदत न घेता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवनात पिठाची गिरणी चालविणारा संतोष पुंड याने गेल्या दोन दशकांपासून प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागात वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी घरपोच सायकलवर भ्रमंती करून विविध पुस्तके वाचण्यासाठी पुरवत आहे या मोफत वाचनालयास कोणतीही शासकीय मदतीची याचना न करता अहोरात्र परिश्रम घेऊन तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज ऑन लाईन वाचनालय सुरु केले त्याद्वारे विविध पुस्तकांची वाचनीय माहिती उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे मोफत फिरते वाचनालय व स्वामी परमानंदगिरी महाराज ऑन लाईन वाचनालय सुरू करून निस्वार्थी सामाजिक बांधिलकी जपणारे या ध्येय वेडा तरुणाच्या निस्वार्थी समाजसेवेची दखल घेऊन नॅशनल इंटेलिजन्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे अंदरसूल व परिसरातील विविध स्तरावरील नागरिक याचा सार्थ अभिमान बाळगत अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत

