
निलेश बावा
तालुका प्रतिनिधी अमळनेर
जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग तसेच रेल्वे मार्गाशी संबंधित विविध तांत्रिक कामे सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर
१९ सप्टेंबर रोजी २ गाड्यांच्या वेळेत बदल १९०४६ थावे-सुरत एक्सप्रेस १ तास ४० मिनिटे तर १२३३५ भागलपूर – एलटीटी एक्सप्रेस १ तास ३५ मिनिटे उशिराने धावतील.
२३ व २४ सप्टेंबर २०२६ रोजी एकूण १२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
२३ सप्टेंबर रोजी १९००७ सुरत–भुसावळ एक्स्प्रेस, १९१०५ उधना–भुसावळ एक्स्प्रेस, १९१०६ भुसावळ–उधना एक्स्प्रेस, ११११४ भुसावळ–देवळाली मेमू आणि ६११३० बडनेरा–नाशिक रोड मेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच २४ सप्टेंबर रोजी १९००८ भुसावळ–सुरत एक्स्प्रेस, ५९०७५ नंदुरबार–भुसावळ पॅसेंजर, ५९०७६ भुसावळ–नंदुरबार पॅसेंजर, ११११९ इगतपुरी–भुसावळ मेमू, १११२० भुसावळ–इगतपुरी मेमू, ११११३ देवळाली–भुसावळ मेमू आणि ६११२९ नाशिक–बडनेरा मेमू या गाड्या रद्द राहणार आहेत.
या कामामुळे काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला असून काही गाड्या विलंबाने धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी संबंधित रेल्वेगाडीचे वेळापत्रक आणि उपलब्धता तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

