
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती व भौतिकशास्त्रातील कौशल्यविकासाला मिळणार चालना
नांदगाव ( प्रतिनिधी ) : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथील *भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने ‘रमन फिजिक्स क्लब’ (Raman Physics Club) 2026-27* या अभिनव शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्रातील संकल्पना केवळ पाठ्यपुस्तकापुरत्या मर्यादित न ठेवता त्यांचा प्रत्यक्ष प्रयोग, मॉडेल्स, सिम्युलेशन, समूहचर्चा व विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून अनुभव देणे, हा या क्लबचा प्रमुख उद्देश आहे.

क्लबच्या Constitution and Operating Charter नुसार हा उपक्रम भौतिकशास्त्र विषय घेणाऱ्या तसेच इतर वर्गातील इच्छुक FY, SY आणि TY B.Sc. च्या विद्यार्थ्यांसाठी खुला असून, तिन्ही वर्षांच्या विद्यार्थ्यांना एकत्रितपणे शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संवादकौशल्य, साहित्य समीक्षा, सेमिनार सादरीकरण, विश्लेषणात्मक विचार आणि संशोधनाची आवड विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
*‘रमन फिजिक्स क्लब’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना JAM, JEST, CDS, GATE , NET, SET तसेच विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन, उच्च शिक्षणाच्या संधी आणि भौतिकशास्त्राच्या औद्योगिक उपयोगांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच FY, SY आणि TY विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक सहकार्याची भावना निर्माण करून विभागामध्ये सक्रिय Academic Support System विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
क्लबच्या कार्यकारिणीत विद्यार्थ्यांच्या तिन्ही वर्षांना प्रतिनिधित्व देण्यात आले असून TY B.Sc. मधील विद्यार्थी अध्यक्ष, SY B.Sc. मधील विद्यार्थी उपाध्यक्ष, तर TY/SY B.Sc. मधील विद्यार्थी सचिव म्हणून कार्य पाहणार आहेत. त्याचबरोबर FY विद्यार्थ्यांसाठी संयुक्त सचिव, विविध वर्षांतील विद्यार्थ्यांसाठी Event & Tech Coordinators तसेच Documentation & Media Lead अशा जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघटनकौशल्य आणि तांत्रिक कौशल्य विकसित होण्यास मदत होणार आहे.
छायाचित्रात प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी क्लबच्या उपक्रमांबाबत चर्चा करताना दिसत आहेत *महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यु . पाटील, भौतिकशास्त्र विभागप्रमुख श्री. स्वप्नील शेंडगे तसेच Faculty Coordinator डॉ. राजेंद्र वाघ, प्रा. बी. पी. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. क्लबच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. एम. बी.आटोळे, डॉ. एम. पी. मेश्राम, प्रा. राहुल बिन्नर, प्रा. सागर कर्वे, श्री केतन पाटील, श्री मनेश बोरसे व विद्यार्थी उपस्थित होते.
‘भौतिकशास्त्र समजून घेणे, अनुभवणे आणि प्रत्यक्ष जीवनाशी जोडणे’ या संकल्पनेवर आधारित रमन फिजिक्स क्लब विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला नवी दिशा देणारा उपक्रम ठरणार आहे. या क्लबच्या माध्यमातून भविष्यात विविध प्रयोग, मॉडेल निर्मिती, विज्ञानविषयक चर्चासत्रे, विद्यार्थी सादरीकरणे, क्विझ, प्रकल्प व संशोधनाभिमुख उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे.

