
नाशिक : ( प्रतिनिधी ) बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणजी जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी वावी येथील आश्रम शाळेत एका विशेष सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना एक वेळचे भोजन, तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला १ वही आणि १ पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

मागील आठवड्यात १६ सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष प्रविणजी जगताप साहेबांचा वाढदिवस झाला होता. वाढदिवसाचा कोणताही बडेजाव न करता, सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना जगताप म्हणाले की, “शिक्षण हे बहुजन समाजाच्या प्रगतीचे मुख्य साधन आहे. महापुरुषांचे विचार डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा आणि देशाचे नाव मोठे करावे.”
आपल्या वाढदिवसाचा आनंद अशा वंचित व गरजू मुलांसोबत साजरा करणे हा संघटनेच्या विचारधारेचा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याच कार्यक्रमादरम्यान बहुजन मुक्ती आंदोलन संघटनेचे अहील्यानगर जिल्हा महासचिव वानिताताई जगताप यांच्या सुपुत्राचा वाढदिवस रविवारी, २० सप्टेंबर रोजी झाला होता. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणजी जगताप यांनी जिल्हा महासचिवांच्या चिरंजीवांना उदंड आयुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी जाहीरपणे क्रांतीसूर्य शुभेच्छा दिल्या.
तसेच गणेश वेलजाळी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गणेश वेलजाळी, रामदास खैरनार,महेंद्र घेगडमल,वानिताताई जगताप,मल्हारी साळवे, प्रिया गवळी,दीक्षा खंडिझोड,अक्षय सोनवणे,महेश नवले,आदीं सह उपस्थित होते.

वावी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षक वृंदाने बहुजन मुक्ती आंदोलन संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाला संघटनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. जगताप साहेबांच्या या अनोख्या वाढदिवस साजरीकरणामुळे परिसरात व राजकीय-सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

