
.
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४०१ वा दिवस*

हे विश्वमहामानवांनो, हे दिव्यलोकनिवासी देवतांनो, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, अमृताचे वारसदार आहात. तुम्ही त्या अमृतस्वरूप परम पुरुषाचे संतान आहात. अज्ञानरूपी तमापलीकडे विराजमान असलेल्या त्या ज्योतिर्मय परम पुरुषाचे दर्शन प्राप्त करून घेणे, या अंधारलेल्या आयुष्यातून त्या प्रकाशमय जीवनाकडे जाण्याचा तो हाच मार्ग आहे. आपले हे अंधकारमय जीवन ही मृत्यूची खाई ओलांडून जाण्याचा आणखी दुसरा मार्ग नाही. मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणाऱ्या ईश्वर तत्त्वाचा उपदेश देणे आणि जीवनातील प्रत्येक कार्यात हे ईश्वर तत्व कसे प्रकट करावे यासंबंधीचा मार्ग दाखवून देणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे.
*स्वामी विवेकानंद…*
आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास ३१ शके १९४८*
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. २२ सप्टेंबर २०२६
★ परिवर्तिनी एकादशी ★ जागतिक कन्या दिन
★ १८८७ महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात बहुजनांसाठी शिक्षणांची सुविधा उपलब्ध करून देणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव (आण्णा) पाटील यांची जयंती.
★ १९२३ जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्मदिन.
★ १९९१ मराठी व हिंदी भाषा भाषेतील तीनशेहून अधिक चित्रपटात भूमिका करणारी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा स्मृतिदिन.
★ कर्मवीर आण्णांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*आहे

