
विंचूर (बाळासाहेब चव्हाण.. विंचूर.) सरदार विंचुरकर म्हणजे विठ्ठल शिवदेव दाणी… हे मूळचे सासवड तालुका पुणे येथील रहिवासी… परंतु पुढे ते त्यांच्या पराक्रमाने तलवार गाजून त्यांना विंचुरकर संस्थान मिळाले… तेव्हा त्यांनी विंचुर गावी एक वाडा बांधला… व ते तेथे राहू लागले… तेव्हापासून त्यांना सर्व”विंचूरकर” असे म्हणू लागले… त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक लढाया मध्ये तलवार गाजवली.. पानिपतच्या युद्धात सुद्धा ते सहभागी झाले होते… परंतु त्यांच्याच सुदैवाने ते त्या युद्धात वाचून सही सलामत विंचुराला परत आले… आणि काही काळानंतर त्यांचे विंचूरच्या वाड्यातच दुःखद निधन झाले…

आजही तो वाडा नेहरू चौकामध्ये बऱ्यापैकी अवस्थेत आहे… त्या वाड्यात फरसबंदी वरून आपण आत गेल्यावर त्याचा भला मोठा लाकडी दरवाजा (प्रवेशद्वार) लागते. त्या दरवाज्याच्या पूर्वेला एका भिंतीवर त्या काळातील विंचूरचे प्रसिद्ध पेंटर कै. किसन त्रंबक ढवण यांनी 60-70 वर्षांपूर्वी एक गणपतीचे चित्र काढलेले आहे… ते अजूनही सुस्थितीत आहे.. हे पेंटर त्या काळी प्रसिद्ध होते ते म्हणजे विंचूरलापूर्वी आखाडा भरवला जायचा.. तो म्हणजे बजरंग गल्ली मध्ये मारुती मंदिरासमोर… आजही विंचुला दोन मारुती मंदिरे आहेत… एक कलगीवाला यांचा म्हणजे नवीन मारुती मंदिर आणि एक तुरेवाला यांचा.. नवीन मारुती मंदिर महात्मा गांधी चौक..तर जो बोहाडा(आखाडा) भरवला जायचा त्यासाठी हे पेंटर सोंगाड्याचे साठे बनून द्यायचे आणि त्याला रंगकाम करायचे… अशी ही सुंदर परंपरा विंचूरला होती…असो सध्या गणपती उत्सव चालू असल्याने मला या राजवाड्याच्या भिंतीवरील गणपतीची आठवण झाली.. म्हणून हा छोटासा लेखन प्रपंच..



