
नांदगाव-(वार्ताहर)-नांदगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी किसन खताळे, कळवण प्रकल्प सहाय्यक प्रकल्प अधिकारी नितांत कांबळे, निरीक्षक साहेबराव सोनवणे,संख्यकी सहाय्यक ओम गवळी, नांदगाव पंचायत समिती विस्तार अधिकारी आनंद यादव,साकोरा ग्राम पंचायत प्रशासक अतुल पाटील, ग्राम सेवक उमेश निकम, अस्वलदरा माजी ग्रामपंचायत सदस्य नरहरी भोसले आश्रम शाळा प्राचार्य समाधान चौधरी,सारताळे, एस. ए. पाटील आमोदे, प्रकाश गावीत सर न्यायडोंगरी, सकाळचे पत्रकार भगवान हिरे, सारताळे अधीक्षक रवींद्र पाटील, दिनेश पगार इत्यादीच्या प्रमुख उपस्थितीत व आदिवासी पारधी क्रांती संघटना अध्यक्ष दिपक खांदे यांच्या अध्यक्षतेखाली आद्यक्रांतिवीर बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करीत अस्वलदरा ता. नांदगाव येथे आदिवासी पारधी जमात जनजागृती मेळावा संपन्न झाला. चित्ररथ द्वारा चित्रफिती दाखवीत विविध योजना प्रदर्शीत करण्यात आल्या.सदर प्रसंगी गटविकास अधिकारी खताळे साहेब सहाय्यक प्रकल्प अधीकारी कांबळे साहेब, निरीक्षक सोनवणे साहेब व साकोरा ग्रामपंचायत प्रशासक अतुल पाटील यांनी आदिवासी पारधी समाजच्या अडचणी व विकासाच्या विविध योजणांची माहिती देत सदर समाजानं शिक्षणाची कास धरून समाजाच्या विविध सवलतींचा लाभ घेत मुख्य प्रवाहत यावं शासन, प्रशासन आपल्या सोबत असल्याची ग्वाही देत कळवण प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन सर्वोतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन कांबळे साहेब आणि सोनवणे देत शासन आपल्या दारी या सेवा संकल्प अभियांनांतर्गत समाजासाठी असणाऱ्या विविध योजणांची सविस्तर माहिती दिली तर दिपक खांदे यांनी पारधी समाजाला व्यसनाधिंता, निरक्षरतेचा चिंता व्यक्त करीत समाजानं शिक्षण, संस्कार आणि आधुनिकतेची कास धरत स्वतः मध्ये परिवर्तन करण्याचे आव्हान केले. जागतिकरणाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी समाजानं सज्ज असायला हवं असं आव्हान केले.वास्त्यांवर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. आभार प्रदर्शन नंतर कार्यक्रम समारोप करण्यात येऊन उपस्थितांनासारताळे व न्यायडोंगरी आश्रम शाळेच्या वतीने अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रम प्रास्ताविक सारताळे आश्रम शाळा प्राचार्य समाधान चौधरी यांनी केले तर सुत्रसंचालन आमोदे आश्रमशाळा प्राध्यापक स्वप्नील बच्छाव यांनी सांभाळले . सदर जनजागृती मेळाव्यास पारधी समाजातील स्त्री, पुरुष, आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

