
निगडोळ:- ( प्रतिनिधी ) रयत शिक्षण संस्थेच्या मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील उर्फ अण्णांची १३९ वी जयंती मंगळवार दि.२२ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात साजरी झाली.रथात आण्णांची प्रतिमा सजवून गावात मिरवणूक काढण्यात आली.तद्नंतर विद्यालयाच्या सभा कक्षात कर्मवीर जयंती उत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला.अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन श्री. बबनराव यशवंत मालसाने होते. आण्णांच्या व सौ.लक्ष्मी वहिनींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मा.अध्यक्ष तथा स्कूल कमिटी व सल्लागार समितीच्या सदस्यांच्या हस्ते झाले.नंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बोरसे डी.डी.यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर आण्णांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकला.बहुजन समाजाला तिमिरातून प्रकाशाकडे नेण्याचा आण्णांचा ज्ञानपरायण वारसा प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीपर्यंत नेणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे आणि हीच खरी आण्णांना आदरांजली ठरेल असे त्यांनी म्हटले.मंदिरापेक्षा ज्ञानमंदिराला दिलेले दान हे ईश्वरालाही सर्वप्रिय असते असे मा.अध्यक्ष श्री.बबनरावजी मालसाने यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री.कापडणीस एन.जे.यांनी केले व उपस्थितांचे आभार श्रीमती.गायकवाड पी.व्ही.यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.बेद्रे एस.व्ही.श्री.देवरे व्ही.ए.श्री.भामरे टी.व्ही.यांनी सहकार्य केले.याप्रसंगी निगडोळ पंचक्रोशीतील पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ,विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी विद्यार्थीवर्ग व पालक वर्ग उपस्थित होते.

