
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४०२ वा दिवस

लोकहितासाठी आपल्याला केल्या गेलेल्या आज्ञेचे जो यत्किंचितही कुरकुर न करता नम्रपणे पालन करतो. तोच खऱ्या अर्थाने नेतृत्व करू शकतो. पूर्ण अज्ञांकितता तर पाहिजेच, पण ती श्रद्धेच्या मोबदल्यात मात्र नको. ज्येष्ठांची आज्ञा ऐकणे अंगवळणी पडल्याशिवाय संघटना निर्माण होणेच शक्य नाही. संघटनेत पूर्ण अनुशासन असायलाच हवी. व्यक्तीव्यक्तींच्या स्वतंत्र शक्तींचे संघटनेमध्ये एकीकरण झाल्याशिवाय कोणतेही श्रेष्ठ कार्य होणे शक्य नाही. एकटी व्यक्ती मर्यादितपणे काम करू शकते, पण संघटित शक्ती मात्र चमत्कार घडवू शकते. शिस्त, विनम्रता आणि संघटित शक्ती" या तीन गोष्टींच्या बळावरच कोणतेही मोठे ध्येय साध्य करता येते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास १ शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. २३ सप्टेंबर २०२६
★ वामन जयंती
★ १८७३ महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
★ १८५८ मराठा साम्राज्याचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँड डफ यांचा स्मृतिदिन.
★ १९३९ आधुनिक मानसशास्त्राचे जनक, आस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ सिंग्मड फ्राईड यांचा स्मृतिदिन.
★ १९५० महाराष्ट्रातील समाजसुधारक डॉ. अभय बंग यांचा जन्मदिन.

