
नाशिक: दि.६ (वार्ताहर)
गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’…! साहित्यिक रसिक आणि श्रोत्यांशी गप्पांचे आयोजन गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोपान वाटपाडे लिखित ‘जनकल्याण राजा छत्रपती शिवराय’ या लोकप्रिय ‘शिवचरित्र’ पुस्तकावर त्यांच्याच भाषेत छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊ व छत्रपती संभाजी महाराज यांना जाणून घेतले. हा कार्यक्रम हुतात्मास्मारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायंकाळी पार पडला. याप्रसंगी अध्यक्ष सुरेश पवार यांच्या हस्ते शिवव्याख्याते सोपान वाटपाडे यांचा गौरव करण्यात आला. माजी आमदार नानासाहेब बोरस्ते अध्यक्ष सुरेश पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण दाते ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन संजय धनगर शिवराज गुजरे उपस्थित होते. व्यासपीठावर संयोजकांनी केलेल्या आवाहनाला साहित्य रसिक श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

