
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४१६ वा दिवस

तीर्थीकुर्वन्ति तीर्थानि सुकर्मीकुर्वन्ति कर्माणि सच्छास्त्रीकुर्वन्ति शास्त्राणि । तन्मयाः। नारद भक्तीसूत्र श्लोक ६९-७०
नास्ति तेषु जातिविद्यारूपकुलधनक्रियादिभेदः।
हे भगवद्भक्त जिथे वसतात ते ठिकाण त्यांच्या निवासाने तीर्थस्थान बनते, ते जे काही बोलतात ते शास्त्र होते, ते जे काय करतात ते सत्कर्म असते हे असे आहे त्यांचे माहात्म्य, हा असा आहे त्यांचा महिमा. हे असले भक्त आणि भगवान एकच होत अभिन्न होत. त्यांनी ज्या जागी वास केलेला असतो ते स्थान त्यांच्या देहांतून निघणाऱ्या पवित्र शक्तिस्पंदनांनी भरून जाते, आणि जे कुणी तिथे जातात त्यांना त्यांना त्या स्पंदनांचा अनुभव येतो व त्यामुळे त्यांच्यातही तेथील त्या पवित्र भावाचा संचार होऊ लागतो. असल्या भक्तांमधे जात, विद्या, रूप, कुल, धन, व्यवसाय प्रभृतींनी भेद पडत नसतो. का की, ते सगळेच त्या प्रभूचे असतात.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास १५ शके १९४८
★ भाद्रपद वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. ७ ऑक्टोबर २०२६
★ पितृपक्ष – द्वादशी श्राध्द
★ १७०८ शिख धर्माचे दहावे गुरू गोविंद सिंग यांचा स्मृतीदिन
★ १८६६ मराठी काव्याचे प्रवर्तक, कृष्णाजी केशव दामले तथा केशवसूत यांचा जन्मदिन.
★ १९१७ कवी आणि बालकुमार साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचा जन्मदिन.

