
सिन्नर ( प्रतिनिधी)संविधान प्रेमी,महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड संघटनेतर्फे आदिवासी विरांगणा महाराणी दुर्गावती, राणा पुंजा भीम जयंती व आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन महात्मा फुले चौकात साजरा करण्यात आला.

परकीय सत्तेच्या विरुद्ध मातृभूमीच्या रक्षणासाठी ज्यांनी पंधराव्या शतकात संघर्ष केला व आपल्या आपल्या प्राणांची बलिदान दिले अशा विरंगणा महाराणी दुर्गावती तसेच राणा पुंजा भील यांची संयुक्त जयंती व जागतिक शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त लोकशिक्षक सत्यशोधक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विरांगणा महाराणी दुर्गावती व राणा मुंजा भील यांच्या प्रतिमेस मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी विरांगणा महाराणी दुर्गावती व राणा पुंजा भिल यांचे परकीय सत्तेविरुद्धचे कार्य तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासातील व राष्ट्र उद्धारातील शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी सरकारने विद्यार्थी व शिक्षकांची जटिल प्रश्न समजावून घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
सामाजिक कार्यकर्ते सुभाष कुंभार यांनी राष्ट्र विकासातील शिक्षकांचे योगदान सांगून शिक्षकांना दिलेले अध्यापनाव्यतिरिक्त कामे सरकारने कमी केले तर शिक्षक विद्यार्थ्यांसाठी जास्त योगदान देऊ शकील परिणामी पुढील भारतातील पिढ्या सक्षम बनतील असे सांगितले.
स्तंभलेखक प्रा. प्रभाकर चतुर यांनी राष्ट्र उद्धाराच्या उभारणीत देशातील शिक्षकांची भूमिका अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. 5 ऑक्टोबर 1994 पासून युनेस्को या संघटनेच्या अनुमतीने शिक्षकांच्या योगदानाबद्दल समर्पित होण्यासाठी 5 ऑक्टोबर हा दिवस” आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन ” म्हणून जगभर पाळला जातो असे प्रतिपादन केले.
आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे विजय मुठे यांनी आदिवासी विरांगणा राणी दुर्गावती तसेच राणा पुंजा भिल यांनी परकियांशी लढाई लढली व आपल्या प्राणाचं बलिदान दिले त्यांचा इतिहास समाजासमोर आला पाहिजे तसेच त्यांचा इतिहास जागृत ठेवणं ही काळाची गरज आहे. आणि त्यांच्या कार्याची माहिती करून दिली.
*यावेळी “📖✒️आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन” असल्याने समस्त शिक्षकांचा गौरव म्हणून प्रातिनिधिक म्हणून *स्तंभलेखक, मविप्र सेवानिवृत्त आदर्श शिक्षक प्रा. प्रभाकर चतुर यांचा महामित्र दत्ता वायचळे, कॉम्रेड हरिभाऊ तांबे, संभाजी ब्रिगेडचे सुभाष कुंभार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे या मान्यवरांकडून गुलाब पुष्पा देऊन सत्कार करण्यात आला*.
कार्यक्रमाचे सुञसंचलन राघोजी ब्रिगेड चे विजय मुठे संभाजी ब्रिगेडचे सुभाष कुंभार, यांनी तर आभार कॉम्रेडचे हरिभाऊ तांबे यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमासाठी अजय लोंढे, शिवाजी सातभाई, सुनील कुऱ्हे सर यश चव्हाण आदि संविधान प्रेमी उपस्थित होते.

