
विंचूर (प्रतिनिधी) लासलगाव, विंचूर आणि परिसरातील १६ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लासलगाव-विंचूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नांतून निधी मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या योजनेच्या नूतनीकरण व नवीन डीआय पाइपलाइन टाकण्याच्या कामाची पाहणी केली

यावेळी नवीन जलवाहिन्या टाकण्याच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सुरू असलेल्या तांत्रिक सुधारणांची माहिती घेतली. भविष्यात योजनेचे वाढते वीज बिल कमी करण्यासाठी आणि अखंडित पाणीपुरवठ्यासाठी मंजूर असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नियोजित जागेबाबत यावेळी चर्चा केली.
यावेळी स्थानिक पदाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पंकज भुजबळ
विधानपरिषद सदस्य महाराष्ट्र

