
नाशिक दि.७ (वार्ताहर)
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता विद्यालय रामेश्वर ता देवळा या विद्यालयात कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रारंभी कर्मवीर डॉ.वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री ढेपले बी के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक श्री सावंत बी एस, शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ढेपले बी के होते. सूत्रसंचालन, प्रास्ताविक व शिक्षक मनोगत व्यक्त करतांना शिक्षक श्री सावंत बी एस यांनी डॉ. वसंतराव पवार यांच्या जीवनकार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री ढेपले बी के यांनी डॉ.वसंतराव पवार यांनी ‘मविप्र’ समाज संस्था वाढीसाठी दिलेले योगदान तसेच वैद्यकीय, राजकीय, सामाजिक, कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याला उजाळा देत दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते असे सांगत त्यांना अभिवादन केले. आभार उपशिक्षक श्री भामरे पी एस यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य शिक्षक शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.

