
पिंपळगाव (ब )(प्रतिनिधी):
म.वि.प्र संचलित कर्म. गणपत दादा मोरे जनता विद्यालयात म.वि.प्र संस्थेचे कर्मवीर डाॅ.वसंतराव पवार यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.थेटे एस.जी.होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले . इ .८ वि या विद्यार्थ्यांनी डाॅ.वसंतराव पवार यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.उपशिक्षिका श्रीम.निकम मॅडम यांनीही मविप्र संस्थेतील डाॅ.वसंतराव पवार यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. थेटे सर यांनी सांगितले की डाॅ. वसंतराव पवार यांचे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय ,वैद्यकीय क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. त्यांनी शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रानुसार संस्थेचा वटवृक्ष केला. एक कुशल शल्यविशारद,संस्थेची शैक्षणिक प्रतीची घोडदौड घडविणारे कर्मवीर,धुरंदर राजकारणी, संवेदनशील साहित्यप्रेमी, दुःखीतांचा व गरीबांना कैवारी, क्रीडाप्रेमी,उत्कृष्ट स्काऊटर, सहकार महर्षी व ऋषितुल्य व्यक्तीमत्व म्हणजे डाॅ.वसंतराव पवार हे होय.अशा शब्दपुष्पांजलींची उधळण करून डाॅ.वसंतराव पवार यांचा दैदीप्यमान जीवनपटच मांडला.
शिक्षणाची दारे ज्याने बहुजनांसाठी उघडली। अशा थोर कर्मवीराला आज वंदना ही घडली।”.
वर्गशिक्षिका श्रीम . राजगुरू मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
कलाशिक्षका श्रीम.गायखे मॅडम यांनी उत्कृष्ट फलक लेखन केले कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.डंबाळे मॅडम, श्रीम . कदम मॅडम,श्रीम.आहेर मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

