
नासिक ( प्रतिनिधी) =इनोव्हेटिव्ह मेकर्स अकादमी फौंडेशन नासिक यांच्या संस्थेकडुन नाशिक कवियित्री यांना “” माझी मी भारी!! विशेष नारी सन्मान पुरस्कार 26 “” संस्थापक प्रा. आशा बिरारी पाटील यांनी घोषित केलेला आहे. संघर्षातून कर्तृत्वाकडे प्रेरणादायी उज्वल वाटचाल करणाऱ्या, आयुष्याने कितीही कठीण प्रसंग समोर आणले तरी स्वतःच स्वतःचा आधार बनून स्वाभिमानाने आणि जिद्दीने उभ्या राहिलेल्या कविता कासार यांचे कार्य प्रेरणादायी आहे व ऑफीस मधील काम उल्लेखनीय आहे एका मोठया विशेष कार्यक्रम मध्ये, दिनांक 18 ऑक्टोबर ला होणाऱ्या या कार्यक्रम साठी विशेष नारी सन्मानासाठी सुहास टिपरे जेष्ठ साहित्यिक यांनी कविता कासार यांचे नामांकन केलें असून पुरस्कार घोषित झाल्याने कविता कासार यांच्या जीवनातील संघर्षाला समाजातून एक प्रकारे न्याय मिळाला आहे. महिला बँक अधिकारी व कर्मचारी यांनी पुरस्कार घोषित झाल्या बद्दल कविता कासार यांचेवर अभिनंदनचा वर्षाव सुरु आहे!!

