
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात निसर्ग सहलीने वन्यजीव सप्ताहाची उत्साहात सांगता.कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयाचे विद्यार्थी व तज्ज्ञांचा सहभाग….
वन्य जीवांचे संरक्षण करणे हे मानवाचे कर्तव्य आहे.मानवांच्या अती हस्तक्षेपामुळे सृष्टीचे नुकसान होत आहे.ते थांबले पाहिजे असे मत शालेय समिती अध्यक्ष तथा पक्षीमित्र डॉ उत्तमराव डेर्ले यांनी व्यक्त केले.

वन्यजीव विभाग नाशिक अंतर्गत आंतरराष्ट्रीय रामसर दर्जा प्राप्त नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान आयोजित वन्यजीव सप्ताह २०२६ ची सांगता सप्ताहाचा समारोप करण्यात आला. चापडगाव कॅम्प व खानगाव थडी कॅम्प येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालय, निफाड यांच्या निसर्ग सहल, पक्षी निरीक्षण आणि अभ्यास दौऱ्याचे आयोजन प्राचार्य डॉ. विनायक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
नाशिक वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे व वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभरात विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले.
सांगता समारंभाप्रसंगी ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ताकाका उगावकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा पक्षीमित्र डॉ.उत्तम डेर्ले, डॉ. नंदकिशोर दुधे आणि वनपाल राजेंद्र दोंड, गोरख पाटील,उपप्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांनी अभयारण्याचे परिसंस्थेतील महत्त्व, जैवविविधता, तसेच मानवी जीवनात वन्यजीव व वनसंपदेचे असलेले स्थान याविषयी सखोल माहिती देऊन वन्यजीव सप्ताहाचा उद्देश स्पष्ट केला. या प्रसंगी निफाड महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.ज्ञानोबा ढगे, प्रा. प्रवीण शेलार, प्रा. जितेंद्र डेर्ले, प्रा. मालती बावरे, प्रा. प्रिया धाराराव, प्रा. एस. आर. नाठे व विद्यार्थी उपथित होते. तसेच बीएनएचएस व वनविभागाच्या श्रीमती नताशा गिरकर, वनरक्षक गोरख पाटील, कैलास सद्गीर, निसर्ग मार्गदर्शक गंगाधर आघाव, सुनील जाधव, एकनाथ साळवे, संजीव गायकवाड, अमोल दराडे, विकास गारे, रोहित मोगल, पंकज चव्हाण, रोशन पोटे, अजित कुटे व साहिल झोमन सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र डेर्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन वनपाल राजेंद्र दोंड यांनी केले.

