
गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात 311 वे पुष्प नाशिक येथील हुतात्मा स्मारकात विष्णू वाघ यांनी गुंफले. सिन्नर येथील लेखक वृक्षमित्र विष्णू वाघ यांच्या निपेऱ्या गाडून घेतल्याची गोष्ट या कादंबरीवर ऐस पैस गप्पा करण्यात आल्या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार विजेते लेखक,अशोक कुमावत सर यांनी केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक,संवेदनशील लेखक,कवी विवेक उगलमुगले हे होते.कार्यक्रमात लेखक वृक्षमित्र विष्णू वाघ यांनी त्यांच्या कादंबरीवर भाष्य करताना कादंबरीची जन्म कहाणी उलगडून सांगितली, निपेऱ्या शब्दाचा अर्थ सांगितला, ते जे कार्य करतात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे त्या वृक्षमित्र फाउंडेशनची संकल्पना व कार्य सांगितले, पेरणी झाली नसली तरी जिद्द कशी अंकुरली हे निपेऱ्या कादंबरीतून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ग्रामीण भागातील लोकसंस्कृती, बोलीभाषा, श्रमसंस्कृती, अंधश्रद्धा, श्रद्धा, निसर्गाशी असलेले नाते, सामाजिक व्यवहार या सर्व गोष्टी कादंबरीतून कशाप्रकारे रेखाटलेल्या आहेत ते त्यांनी सांगितले, बालपणीच्या चुका, खोडकरपणा, अपमान , परवड, गरिबी, अपयश, संघर्ष आणि त्यातून मिळालेले जीवन धडे हे त्यांनी प्रांजळपणे मांडले, निपेऱ्या म्हणजे एका पिढीचा जगण्याचा, संघर्षाचा, संस्काराचा, बदलत्या काळाचा शब्दबद्ध इतिहास आहे, निपेऱ्या म्हणजे मातीशी नाळ जोडलेल्या जगण्याची हिरवी कहाणी आहे, सामान्य मुलाने शिक्षणासाठी केलेली संघर्षाची धडपड आहे. खऱ्या अर्थाने माणुसकीची पेरणी या कादंबरीतून झाली आहे असे मत लेखकाने मांडले. संपूर्ण कादंबरीतून जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तो थोडक्यात लेखकाने पुस्तकावर बोलू काही या आजच्या कार्यक्रमात मांडला. या भागातील भाग्यवान विजेते म्हणून दत्तू दाणी व सौ.चिंधडेताई यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला, लेखकाचा सत्कार लेखक राजेंद्र देसले यांनी शाल व पुस्तक भेट देऊन करण्यात आला. आजच्या कार्यक्रमात चौथ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अलका दराडे, स्वागताध्यक्षा सुनंदा पाटील,ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम ढिकले, ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र हिंगणे, अजित कुलकर्णी,कवयित्री जयश्री वाघ, डॉ .चिंधडे,वैशाली वाघ, हाडपे सर, सानिका वाघ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अर्जुन वेलजाळी यांनी केले.

