
सिन्नर नगरपरिषदेचे वतीने आयोजित पर्यावरण पुरक श्री गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात सिन्नर नगरीतील विविध क्षेत्रात भरीव कार्य करणारे व्यक्ती व सामाजिक संस्थाचा सन्मान सोहळा तसेच निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न झाले.
गोंदेश्वर मंदिर,ऐश्वर्यश्वर मंदिर,शिवचरित्र,यादव कालीन सिन्नर शहरातील ऐतिहासिक वारसास्थळे यातील ऐतिहासिक संशोधन कार्याची दखल घेऊन या सुंदर सोहळ्यात सपत्नीक मा.जि.प.सदस्या सीमंतिनीदिदी कोकाटे,नगरसेवक मनोजभाऊ देशमुख व सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, वृक्षभेट देऊन गौरवण्यात आले व कौतुकाची थाप देण्यात आली.
❣️आपण ज्या नगरीत कार्य करत आहोत त्या नगरीच्या सर्वोच्च संस्थेकडून सन्मान होणे व कौतुकाची थाप मिळणे हे खरे तर जगातल्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे असते.हा सन्मान मला मिळाला त्याबद्दल सिन्नर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले,उपनगराध्यक्ष हर्षदआण्णा देशमुख,आरोग्य समिती सभापती श्रीम.ललिताताई हांडे,उत्तम कवी व प्रशासक मुख्याधिकारी अभिजित कदम सर,सर्व सन्मानीय नगरसेवक,जनसंपर्क अधिकारी अनिल जाधव सर या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद🙏🏼
-शिवव्याख्याता प्रा. जावेद शेख,सिन्नर
-पुस्तक – गोंदेश्वर मंदिर दर्शन
8329839434

