
नांदगाव -(वार्ताहर)ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचलित कै. बाबुलाल देवचंद पगार आश्रम शाळा सारताळे येथे आज संस्था कोषाध्यक्षा तथा प्राथमिक आश्रम शाळा मुख्याध्यापिका मा. नम्रता पगार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान हिरे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य समाधान चौधरी,आर. एम.पगार, के. जे. पगार सर होते.सदर प्रसंगी प्राचार्य समाधान चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सबोधन करतांना उज्वल भविष्या साठी परिस्थितीची नाही तर जिद्द आणि चिकाटीची गरज असते

आणि कलाम साहेबांनी आपल्या कर्तृत्वातून व उच्च शिक्षणाने हे सिद्ध करून दाखवले असे नमुद केले.एक पेपर विक्रेता तर शास्रज्ञ, शिक्षण तज्ञ,राष्ट्रपती पदा पर्यंतचा प्रवास थक्क करणारा होता म्हणुन आयुष्यात नेहमी मोठी स्वप्ने पहावी व ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे असे मत मांडले. कार्यक्रम अध्यक्ष भगवान हिरे सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात वाचन संस्कृतीचे महत्व
सांगत,विद्यार्थ्यांना वाचाल तर टिकाल असा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रम प्रास्ताविक महेश आहेर सर यांनी केले तर सुत्रसंचालण भुषण बोरसे सर यांनी सांभाळले.आभार प्रदर्शनाने कार्यक्रम समारोप करण्यात आला.


