
पळसे येथे ग्रामाभिमान मंचची काव्यवाचन स्पर्धा संपन्न
नाशिकरोड:-( प्रतिनिधी ) पळसे येथील ग्रामाभिमान मंचच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त संत आईसाहेब महाराज सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक धनसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शामराव गायधनी प्रायोजित रोख पाच हजार रुपये आणि चषक त्र्यंबकेश्वरच्या नाविन्या मिंदे यांच्या कवितेला प्रदान करण्यात आला.
शिंगवे गावचे माजी उपसरपंच धोंडीराम रायते प्रायोजित रोख चार हजार रुपये आणि चषक असे द्वितीय पारितोषिक पैठणच्या अंकित आव्हाड यांना तर सैन्य दलातील जवान संदीप म्हस्के प्रायोजित रोख तीन हजार रुपये आणि चषक सुवर्णा कळसकर यांच्या कवितेला प्रदान करण्यात आले. बालकवयित्री उन्नती नाकील आणि श्रावणी गायखे यांना मंगला गायकर, कवी रवींद्र मालुंजकर पुरस्कृत उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. सुप्रसिद्ध साहित्यिक विवेक उगलमुगले यांनी परीक्षण केले. सहभागी स्पर्धकांना माऊली कम्युनिकेशनचे संचालक मनोज ढेरिंगे यांच्या वतीने सहभाग सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पिक्टोग्राम इव्हेंट्सचे संचालक विकास गायधनी यांनी छायाचित्रणाससह प्रसारमाध्यम प्रक्षेपण केले.
प्रायोजकांसह पळसे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, उपाध्यक्ष अशोक गायधनी, सेक्रेटरी राजाराम गायधनी, शिवाजी गायखे, विजय क्षीरसागर, रामदास गायधनी, रुंजाभाऊ गायधनी, हभप यशवंतराव आगळे, महाराष्ट्र माझा परिवाराचे मनोज ठाकरे, सौरभ बैरागी, कामगारनेते नामदेव गायधनी, माजी सरपंच नवनाथ गायधनी, पळसे सोसायटी आणि दारणाकाठचे चेअरमन बाळासाहेब सरोदे, व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर माऊली गायखे, शेतकी संघाचे माजी सभापती शरद गायखे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश गायधनी, नंदू चव्हाण, सुनील पवार, बहिरू गायधनी, संत जनार्दन स्वामी पतसंस्थेच्या माजी चेअरमन लीलाताई गायधनी, विद्या काकळीज, चंद्रकांत उगले, कैलास गायकर, मंगल गायकर, लक्ष्मण जाधव, भारत गायधनी, संत आईसाहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर संधान, संजय बोरसे, सरला वाघ, आशीर्वाद गायखे, समाधान गायखे, योगिता देवराळे, शाम साबळे, ज्ञानेश्वर गायधनी आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष सुनील आगळे, प्रवीण गायधनी, विकास गायधनी, राहुल फडोळ, प्रमोद गायधनी, प्रदीप गायधनी, बापू महाराज फोकणे, श्रीराम पगार, गणेश आगळे, ओमकार गायधनी, सोहम गायधनी, अमोल गायधनी, भास्कर चौधरी, रवींद्र टिळे, मानसी गायधनी, सागर गायधनी, गौरव वाघे, कृष्णा सहाणे यांनी केले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव समाधान गायधनी यांनी आभार मानले.

