
सिन्नर तालुका वृत्तपत्र विक्रेते , महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने साजरा करण्यात आला
यावेळी माजी राष्ट्रपती ए पी जी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस राजेंद्र जाजू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला

यावेळी महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की ज्यांना मिसाईल मॅन म्हटले जाते, त्यांच्या ज्ञानातून त्यांनी देशाला अनेक क्षेपणास्त्रे दिली आणि देशाला शक्तिशाली बनवले डॉ.कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव. यामुळेच डॉ.कलाम यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. तसेच राष्ट्रीय वृत्तपत्र दिनाच्या सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना शुभेच्छा
वृत्तपत्र वितरक राजेंद्र जाजू यांनी १५ ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डाॅ.ए पी जी अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो तसेच वसंतराव नाईक यांनी माझ्या वडिलांना पेपरची एजन्सी दिली व सुभाष शेठ जाजू यांनी वर्तमानपत्र विक्रेते छोटे खाणी सिन्नर तालुक्यात व्यवसाय सुरू केला नंतर राजेंद्र जाजू यांनी मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्रे गावागावांमध्ये व शहरातील कानाकोपऱ्यापर्यंत घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम केले आणि अनेक बेरोजगार तरुणांना वृत्तपत्र वाटण्याच्या काम मिळाला
राष्ट्रीय वृत्तपत्र दिनानिमित्त सर्व वृत्तपत्र विक्रेते यांना ग्रंथ पेन व मिठाई वाटप केली माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेते दिनाच्या शुभेच्छा यांनी दिल्या
विजय मुठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की डॉ.ए पी जी अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांनी पुस्तके त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि भारत सुरक्षित व्हावा या उद्देशाने त्यांनी पृथ्वी, अग्नी अशी क्षेपणास्त्रे भारताला दिले देशाला शक्तिशाली आणि स्वावलंबी बनवले. तसेच राष्ट्रीय वृत्तपत्र दिनाच्या सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना शुभेच्छा दिल्या
यावेळी एसटी कामगार सेनेचे नेते देवा भाऊ सांगळे यांनी भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती दिली व तसेच राष्ट्रीय वृत्तपत्र दिनाच्या सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे व प्रास्ताविक राजेंद्र जाजू तर आभार सुरेश कपिले यांनी मांडले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, वृत्तपत्र वितरक राजेंद्र जाजू आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, देवा भाऊ सांगळे प्रकाश माळी प्रविण आव्हाड सुरेश कपिल मनोज खैरे संदिप खर्ज नितीन सोनवणे गौरव दळवी गणेश काळेच विनायक मुळे मंगेश वाजे अशोक उकाडे कुणाल सांगळे पिटू दळवी रामदास क कुटे सर्व वृत्तपत्र विक्रते व मोठे संख्येने नागरिक उपस्थित होते

