
शासकीय विभागीय ग्रंथालय व पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी करतांना रावसाहेब गायधनी, अविनाश येवले, संजय पाटील, हेमंत देशपांडे, विलास सोनार आदी
नाशिकरोड 🙁 प्रतिनिधी ) शासकीय विभागीय ग्रंथालय नाशिक व पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय नाशिकरोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाचन प्रेरणा दिन व ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी रावसाहेब गायधनी यांनी प्रतिपादन केले. यावेळी प्रमुख पाहुणे शासकीय विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले, प्रभारी प्राचार्य संजय पाटील, श्रीमती र. ज. चव्हाण (बि.) गर्ल्स हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक हेमंत देशपांडे, उपप्राचार्या संगीता पवार पर्यवेक्षक श्रावण सूर्यवंशी ग्रंथपाल विलास सोनार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शासकीय विभागीय ग्रंथालय, नाशिक कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या थोर राष्ट्रपुररूष, समाजसुधारक, साहित्यिक व विचारवंतांच्या चरित्रमय ग्रंथांचे व शाळेने विविध दुर्मिळ साहित्यांच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सरस्वती व डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य संजय पाटील यांनी केले. प्रस्ताविकात वाचन प्रेरणा दिनाची माहिती सांगितली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त “अमृतवेल, ठाणे” या संस्थेने राज्यातील निवडक शंभर शाळांमध्ये वाचनाची स्पर्धा आयोजित केली असून त्यामध्ये पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय शाळेला संधी मिळाली ही अभिमानाची व अभिनंदनाची बाब असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे अविनाश येवले, यांनी ग्रंथ, ग्रंथालये आणि वाचनाचे महत्व उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी “आम्ही दररोज किमान अर्धा तास छापील पुस्तकाचे वाचन करू.” “शाळेच्या ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करू आणि वाचनाची गोडी जोपासू.” अशी प्रतिज्ञा घेतली. उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शासकीय विभागीय ग्रंथालय, नाशिक चे सभासद होण्याचे आवाहन केले. परिचय व स्वागत भरत भालेराव यांनी केले. मानव शिरोडे या विद्यार्थ्याने “अग्निपंख” या पुस्तकाची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब गायधनी यांनी विद्यार्थ्यांनी क्रमिक पाठ्यपुस्तकांसोबत संदर्भ पुस्तकांचे वाचन करावे. पुस्तकेच माणसाला घडवतात असे सांगून दोन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल श्रीमती र. ज. चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल, आरंभ महाविद्यालय मधील सुमारे दोन हजार विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद यांनी अतिशय दुर्मिळ अशा पुस्तकांच्या प्रदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल विलास सोनार यांनी मांडले सूत्रसंचालन भावना कोष्टी यांनी केले.

