
लेखक:- विलास पंचभाई
काल अचानक गावाला जाणे झाले गावात गेल्यावर संध्याकाळ झाली होती संध्याकाळचे पूर्ण दृश्य डोळ्यातून मनात साठवून घेतलं..कधी गतकाळात गेलो कळलंच नाही
पूर्वीचे रुंद रस्ते अरुंद झाले होते पूर्वी संध्याकाळी अंगणात खाटा पडायच्या.. खाटीवर बसून माणसं एकमेकांशी संवाद साधायचे आज मात्र सर्वत्र काँक्रीटच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या आहेत
घर रस्त्याला लागून जवळ आली आहेत परंतु माणसं मात्र अबोल झाली आहेत… त्यांच्यातील अंतर वाढलं आहे
काहीच सांगत नाहीत ते एकमेकांना आपल्या मनातलं
मनातल्या मनात विचार करत
गुजर काकू कडे गेलो.. मला थोडी थोडी अहिराणी येते म्हणून तिला तसंच विचारलं
काय काकू कशी शे..
बर शे रे भाऊ… असं म्हणून तिने मलाच विचारलं
तू कसाशे..ओहू पोरी बिरी कशा शेतस…
मी उत्तर दिलं ..बठ्ठा चांगला शेतस..
मी विचारल भिला कठे शे
मग तिने आपल्या तोंडाचा पट्टा चालवला
मरी माय खायजो त्याले.. त्यानं काय सोदस
वाट्टोळ व्हयी जाओ त्यानं..
काकू असं काय व्हयी गे…
पोटच्या पोराबद्दल इतका अभद्र बोलत होती ती ऐकतांनाही त्रास होत होता आणि तिचा जीव मात्र फाटत होता
भाऊ.. तुना काका मरी ग्या आणि
हाऊ बाट्टोडनी वावर त्याना नाववर करी लीदं
मनी खावानी मवताद व्हयी गयी….. बापरे
गावमातला लोक काय म्हणतंस
काय म्हणतीन त्या … सर्व चाटीग्यात
तसाच घराजवळ आलो…
घर आता घर राहीलं नव्हतं पडीक झालं होतं
कोणीच रहात नसल्याने त्यांची बिकट अवस्था झाली होती
एक काळ होता की सतत वर्दळ असायची…
आण्णा ओट्यावर बसूनच हुकुम सोडायचे….
अंगणातच बाजार भरायचा… आठवड्यातून पगार झाल्यामुळें
सर्वच लोक बाजारातून चीज सामान खरेदी करायचे
दाळ्या मुरमुरे शेव हा आमचा आनंदाचा उत्सव असायचा
आधी रस्ते जेमतेम होते आता सर्वत्र काँक्रीट झाले आहेत…
शाळा इंग्रजी माध्यमाच्या झाल्या आहेत
ठिगळाचे कपडे वापरणारे लोक इस्त्री च्या कपड्यात वावरत
आहेत…गावात आधी भांडण खुप दिसायची तमाशा बघायला गर्दी गोळा व्हायची आता परिस्थिती बदलली आहे सर्वं कामधंद्याला असल्याने समृद्धी आली आहे…
रात्रीचे आठ वाजले गांव दिव्यांनी लखलखीत होतं
पुर्वी एखाद्या विजेच्या खा़बावर लाईट लुकलुकायचा…
त्याचा प्रकाश चिमणी पेक्षा थोडा जास्त एवढ़च काय समाधान
जेवणं झाली की लोकं आपापल्या अंगणात खाटी टाकायचे
पडल्या पडल्याच एकमेकांची चौकशी करायचे..
एखादा गावातला माणुस आला की खाटीवर बसुनच गप्पा हाणायच्या…इकडची तिकडची चौकशी व्हायची मन मोकळं व्हायचं..आण्णा कधी कधी पडल्या पडल्या पाय दाबायला सांगायचे…तळपाय अगदी खरखरीत पायाला मोठ्या भेगा
पाय दाबले की 5/10पैसे मिळायचे..पण पाय दाबायच्या धाकाने पळ काढायचो…आता गावात खाटी दिसत नाही प्रत्येकाच्या घरात बेड तयार झालेले माणसं घरातच झोपतात…
त्यामुळे आताश: खाटींची जत्रा भरत नाही किंवा माणसंही जवळ येत नाही जो तो आपल्या कुटुंबातच मग्न… पुर्वी एखादी मुलगी सासरहुन माहेरी आली की आजूबाजूच्या पोरी गोळा व्हायच्या.. एकमेकींच्या हातावर मेहंदी काढायच्या गप्पा रंगायच्या.. आधी गावातही भाजीपाला बख्खळ मिळायचा.. मोजून मापून नाही..पण आता डिजिटल काटे आले आहेत..आता सा-यांनाच मोबाईल ने वेडं केलय.. आधी विरंगुळा म्हणून लोक स्वच्छालयाला बाहेर जायचे लांब वर.. त्यावेळी मित्रमित्र खूप गप्पा मारायचे, आता प्रत्येकाच्या घरात बाथरूम झाल्यामुळे लोक बाहेरच पडत नाही.. घरातील टॉप टीप सुंदर काँक्रीटची झाली आहेत.. कोचिंग क्लासेस , जिम हब झालेत मैदान ओस पडलीत
बैलगाड्याचा खडखडाट ही फारसा काणी ऐकू येत नाही ..घरही मोठी मोठी पॉश झाली आहेत पण मन अगदी छोटे छोटे.. लोकं आता खूप छोट्या छोट्या कारणासाठी ही चिडचिड करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या मोठा झाला म्हणून त्याचा मोठेपणा नाही तर आपण कसा मोठे होऊ याची इर्षा लागते..मोबाईल हातात आला की कोणाची गरज पडत नाही..न
श्रीमंती पुढे गांवही समाधान विसरतय चाललय..लोकं आपुलकी विसरत चालले… कदाचित ही आमची शेवटची पिढी असेल की गावाबद्दल कळवळा आहे अशी…
गावाचे शहरीकरण होत आहे गांव ही आता बदलत आहे…
विलास पंचभाई
नाशिक

