
मालेगाव ( प्रतिनिधी ): भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प. बा. काकाणी नगर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र अजय नवलराय शाह यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला झुं.प. काकाणी विद्यालयातील इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अजय शाह यांनी वाचनाचे महत्त्व, ग्रंथालयाची भूमिका, ग्रंथसंस्कृती आणि वाचनासंदर्भातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे विचार याविषयी मार्गदर्शन केले. तसेच प. बा. काकाणी नगर वाचनालयाची थोडक्यात माहिती देत विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी केल्याबद्दल जी. जे.पाटील,व्ही.आर.कऱ्हाडे या शिक्षकांचा ग्रंथभेट व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ग्रंथालयांविषयी जागरूकता वाढवणे आणि डॉ. कलाम यांच्या विचारांतून प्रेरणा घेणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
याप्रसंगी वाचनालयाचे ग्रंथपाल अजय जोशी,संजय जगताप, अप्पा जगताप व अनेक वाचक सभासद उपस्थित होते.

