
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४२६ वा दिवस

स्त्री जातीचा अभ्युदय झाल्याखेरीज भारताचे कल्याण होणे अशक्य ! जोपर्यंत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा विकास वा सन्मान होत नाही, तोपर्यंत भारताचा उदय वा पुनरुत्थान होणे अशक्य आहे. एकाच पंखाने पक्ष्याला उडता येणे सर्वथैव असंभव आहे ! एवढ्यासाठीच रामकृष्ण ठाकूरांनी स्त्रीला गुरू वा जगत जननी म्हणून स्वीकारले, तिची कालीमाता म्हणून षोडशोपचार पूजा केली. यासाठीच त्यांची स्त्री भावाने साधना, याचसाठी मातृभावाचा प्रचार आणि म्हणूनच प्रथम स्त्रीयांचा मठ स्थापण्याचे आमचे प्रयत्न ! स्त्रियांना स्वतःचे निर्णय स्वतः घेता यावेत, त्यांनी शिक्षण आणि अध्यात्माच्या क्षेत्रात स्वावलंबी व्हावे, म्हणूनच पुरुषांच्या मठाप्रमाणेच स्त्रियांसाठी स्वतंत्र मठ निर्माण व्हावेत. समाजात स्त्रियांकडे केवळ भोगवस्तू वा समाजाचा कमकुवत घटक म्हणून न पाहता, 'जगन्माता' या आदराच्या स्थानाने पाहिले पाहिजे, ज्यामुळे समाजात नैतिक मूल्ये वाढतील.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास २५ शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द ७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. १७ ऑक्टोबर २०२६
★ १८६९ भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक, गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांचा जन्मदिन
★ १८८२ संस्कृत, इंग्रजी व्याकरणकार, ग्रंथकार, समाजसुधारक, लघुलेखक दादाबो पांडूरंग तर्खडकर यांचा स्मृतिदिन.
★ १८९२ कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्मदिन
★ १९१७ सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ आण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचा जन्मदिन
★ १९५५ सुप्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेत्री, खांदेशकन्या पद्मश्री स्मिता पाटील यांचा जन्मदिन.
★ जागतिक गरिबी निर्मूलन दिन.

