
नाशिकरोड :- शारदीय नवरात्रोसवानिमित्त विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व वागेश्वरी सोशल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आज रविवार (१८) रोजी वागेश्वरी देवी मंदिरात सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वागेश्वरी देवी मंदिर, पंचक जेलरोड नाशिकरोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराचे आयोजक विभागीय संदर्भ रुग्णालय हे असून सह आयोजक वागेश्वरी सोशल फाऊंडेशन आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून हे रक्तदान शिबिर नियमितपणे वाघेश्वरी देवी मंदिरात आयोजित केले जात आहे यंदाचे वर्ष या रक्तदान शिबिराचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी व मित्रपरिवार यांनी या रक्तदान शिबिरात रक्त दान करून राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे असे आवाहन विभागीय संदर्भ रुग्णालय व वागेश्वरी सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

