
नाशिक (प्रतिनिधी) बालपणापासुन सोसलेल्या कष्टामुळे शेतकरी आंदोलन करताना एक विचारधारा घेऊन चळवळीला वाहून घेतले. आजुबाजुच्या परिस्थितीचा उद्रेक म्हणजे माझे शब्द असुन, माणूसपण चेचवण्यासाठी विद्रोहाचे स्वरूप पेरून जीवनाला नवा आयाम देणारी नात्याची जेव्हा मोडतोड होते ते दुःख वेदनादायक असते असे प्रतिपादन कवी शिवाजी भालेराव यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात ३१४ वे पुष्प गुफंताना दिंडी निघणार आहे या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र देसले होते.
शिवाजी भालेराव पुढे म्हणाले की, चळवळ हि केवळ एखाद्या ध्येयासाठी नसते. तर ती प्रतिकुल परिस्थितीचा सामना करताना होणारा उद्रेक म्हणजे चळवळ बनते. शेतीमातीच्या वातावरणात अनेक अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. दररोजच्या जगण्याची दिंडी दुख हलके करण्यासाठी कष्टकरी शोषीत गंध गोळी अनअष्टगंधाने मिटलेल्या देव्हार्यातून विठ्ठलाला हातात घेऊन आता दिंडी निघणार आहे गावागावातून सत्ताधाऱ्यांच्या छावणीवर हल्लाबोल नामाचा गजर करत…. दुष्काळ आणि वनव्यात करपलेला बालपण शेती आणि शिक्षणाची झालेले परवड त शिक्षणाची पायरी काढताना पाचवीला अगोदरच पुजलेल्या दुष्काळाचे भोग यामुळे वर्षांनुवर्ष माती व श्रमावर अपार निष्ठा ठेवून खरीप रब्बी हंगामाचा जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्यांचे दुःख काय असते हे जवळून पाहताना अनेक स्वप्नांची धूळधाण झालेली प्रत्यक्ष पाहिल्यामुळे पुरोगामी चळवळीशी अधिक नाते जोडले गेले. आणि आयुष्याला दिशा मिळाली.
यावेळी भूषण सप्रे, अजय महाले या भाग्यवान श्रोत्याना ग्रथंभेट देउन सन्मानीत करण्यात आले.
सुत्रसंचालन कवी अशोक कुमावत यांनी केले तर योगाचार्य अशोक पाटील यांनी आभार मानले.
दरम्यान येत्या मंगळवार २० ऑक्टोबर रोजी प्रा डॉ. भगवान अंजनीकर राजर्षी शाहू महाराज या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.

