
त्र्यंबकेश्वर ( प्रतिनिधी ): मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १० ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय क्रॉसकंट्री मुले व मुली स्पर्धेची सुरुवात त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गावीत साहेब व महाविद्यालयाचे क्रीडाप्रेमी प्राचार्य डॉ.सोमनाथ घुले सर यांनी खेळाडूंना हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या स्पर्धेच्या अध्यक्षपदी मविप्रचे नाशिक शहर संचालक लक्ष्मणराव लांडगे साहेब होते तर उद्घाटक म्हणून मविप्रचे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश (आबा) पिंगळे होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, अरुण पिंगळे, राजेंद्र ढबले, विद्यापीठ प्रतिनिधी प्रा.हेमंत पाटील, निवड समितीचे अध्यक्ष प्रा.बालाजी जाधव, तसेच निवड समितीचे सदस्य विजयकुमार बेंगळे, प्रा.दादासाहेब लोखंडे, कल्पना बागुल, तसेच सर्व संघव्यवस्थापक, मार्गदर्शक आदी मान्यवर उपस्थित होते. या मुलींच्या स्पर्धांमधून प्रथम क्रमांक साक्षी कसबे-नाशिक, द्वितीय क्रमांक अंजली पंडित-नाशिक, तृतीय क्रमांक निशाकुमारी पासवान-अहिल्यानगर, तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक गोविंद पाडेकर-नाशिक, द्वितीय क्रमांक अनिल जाधव, तृतीय क्रमांक सुरज माशी -नाशिक यांनी पटकावला. या मुले व मुलींच्या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद नाशिक विभागाने पटकावले. या स्पर्धांमधून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाची निवड करण्यात आली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ.दिनेश उकिर्डे व विक्रम पोटे तसेच सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व खेळाडू विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.त्र्यंबकेश्वर : मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १० ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय क्रॉसकंट्री मुले व मुली स्पर्धेची सुरुवात त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गावीत साहेब व महाविद्यालयाचे क्रीडाप्रेमी प्राचार्य डॉ.सोमनाथ घुले सर यांनी खेळाडूंना हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या स्पर्धेच्या अध्यक्षपदी मविप्रचे नाशिक शहर संचालक लक्ष्मणराव लांडगे साहेब होते तर उद्घाटक म्हणून मविप्रचे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश (आबा) पिंगळे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, अरुण पिंगळे, राजेंद्र ढबले, विद्यापीठ प्रतिनिधी प्रा.हेमंत पाटील, निवड समितीचे अध्यक्ष प्रा.बालाजी जाधव, तसेच निवड समितीचे सदस्य विजयकुमार बेंगळे, प्रा.दादासाहेब लोखंडे, कल्पना बागुल, तसेच सर्व संघव्यवस्थापक, मार्गदर्शक आदी मान्यवर उपस्थित होते. या मुलींच्या स्पर्धांमधून प्रथम क्रमांक साक्षी कसबे-नाशिक, द्वितीय क्रमांक अंजली पंडित-नाशिक, तृतीय क्रमांक निशाकुमारी पासवान-अहिल्यानगर, तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक गोविंद पाडेकर-नाशिक, द्वितीय क्रमांक अनिल जाधव, तृतीय क्रमांक सुरज माशी -नाशिक यांनी पटकावला. या मुले व मुलींच्या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद नाशिक विभागाने पटकावले. या स्पर्धांमधून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाची निवड करण्यात आली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ.दिनेश उकिर्डे व विक्रम पोटे तसेच सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व खेळाडू विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

