
मुंबई : बहुचर्चित बहुआयामी सगर साहित्यिक परिवाराची अनमोल वैचारिक वैविध्यपूर्ण साहित्यकृती श्री साहेबराव नंदन तात्या संपादित, सगर दीपोत्सव दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण मुंबई येथे प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिका, पत्रकार, कवयित्री, आदर्श शिक्षिका पुरस्कार्थी आशा ब्राम्हणे यांच्या शुभहस्ते त्यांच्या निवासस्थानी उत्साहात संपन्न झाले. सगर दीपोत्सव दिवाळी अंकाचे वर्ष ५ वे असुन, दिवाळी पर्वात प्रकाशनाचा मानस असल्याचे सगर साहित्य परिवाराचे सदस्य प्रसिद्धी प्रमुख ग्रामिण आवाज चे संपादक अमृत घरटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे. या आधी मिराभाईंदर ठाणे येथे कवयित्री सौ सुनिता महाजन, बल्लारशाहा चंद्रपूर येथून अभिनेत्री गायत्री रामटेके यांच्या हस्ते मुखपृष्ठाचे अनावरण झाल्याने सगर साहित्य परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सगर दीपोत्सव दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करताहेत चंदपूर जिल्ह्यातील बलारशा येथून साहित्यिका अभिनेत्री गायत्री रामटेके

सगर साहित्य निर्मित सगर दीपोत्सव दिवाळी अंक २०२६ च्या मुखपृष्ठाचे अनावरण, जेष्ठ साहित्यिका सौ. सुनिता अरविंद महाजन BSC. Bed विज्ञान गणित विषयाच्या निष्णांत मा. शि. मिराभाईंदर जि. ठाणे यांच्या हस्ते मिराभाईंदर ठाणे येथे उत्साहात संपन्न झाले. लवकरचं दिवाळी पर्वात सगर दीपोत्सव अंकाचे प्रकाशन होईल.

