
साहित्य भारती व महाराष्ट्र साहित्य परिषद सिन्नर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदेश्वर मंदिर दर्शन पुस्तकावर चर्चात्मक संवाद व प्रत्यक्ष वारसा स्थळ गोंदेश्वर मंदिराला भेट याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुस्तकातील विविध माहिती,मंदिराचा इतिहास,स्थापत्यशैली,शिल्पवैभव व प्रत्यक्ष मंदिरातील स्थापत्य शिल्पवैभव यांची सांगड घालत चर्चात्मक संवाद साधत मंदिर दर्शनाचा अनुभव घेतला.
सदर भेट प्रसंगी साहित्य अकादमी,दिल्लीचे कार्यकारी मंडळाचे केंद्रीय सदस्य डॉ.नरेंद्र पाठक,साहित्य अकादमी मुंबईचे प्रादेशिक सचिव डॉ.अरुण ठोके,प्रा.राजाराम मुंगसे, किरण भावसार,रवींद्र कांगणे,शाहीर स्वप्नील डुंबरे,सोमनाथ एखंडे, डॉ.श्यामसुंदर झळके,सुनीताताई वाळुंज,वृक्षमित्र विष्णू वाघ, देवा थोरात साहित्यिक,कवी मान्यवर उपस्थित होते.
सदर अभ्यासपूर्ण भेटीचे आयोजन व नियोजन सुप्रसिद्ध कवी किरण भावसार यांनी केले
🔹सदर कार्यक्रमाची प्रसिद्धी सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात देणारे सर्व सन्मानीय पत्रकार बांधव,साहित्य भारती व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी,सदस्यांचे व कवी किरण भावसार यांचे मनःपूर्वक आभार.🙏🏼
- लेखक प्रा.जावेद शेख,सिन्नर
- पुस्तक – गोंदेश्वर मंदिर दर्शन
- 8329839434

