
नाशिक 🙁 प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनात कवी संजय आहेर यांच्या ‘स्ट्रॉबेरी’ या कवितेला काव्य क्षेत्रातील मानाचा ‘कवी गोविंद काव्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

संमेलनाध्यक्ष तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य प्रकाश होळकर आणि सार्वजनिक वाचनालय, नाशिकचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे कवी संजय आहेर यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव झाला असून, काव्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याला मानाची पावती मिळाली आहे.
या प्रसंगी काव्य संमेलनाध्यक्ष राजू देसले, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत जाधव, डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष संजय करंजकर, सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर, अर्थसचिव प्रा. सोमनाथ मुठाळ, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. ऐश्वर्य पाटेकर, माजी न्यायमूर्ती वसंतराव पाटील, इन्कमटॅक्स कमिशनर संजय बोढारे यांच्यासह साहित्य, कला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

