
नांदगाव: ( प्रतिनिधी)
सन २०२५/२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ८ वी) मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या कु. आरूषी गणेश बोरसे ह्या विद्यार्थ्यांनीने घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयाने नांदगाव तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला असून, तिच्या दैदिप्यमान यशामुळे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि विद्यालयाची शैक्षणिक परंपरा पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
विद्यालयाच्या कु.आरूषी बोरसे हिला तालुक्यात मिळवलेल्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय काकळीज आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी यशस्वी विद्यार्थिनीचं , तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि पालकांचे कौतुक केले आहे.
“विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि शिक्षकांनी योग्य मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले आहे. न्यू इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु. आरूषी बोरसे हिने तालुक्यातून अव्वल स्थान पटकावून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे.”अशा शब्दात इंजि अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

