
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या के. ज. म्हात्रे वाचनालयाची विस्तारित इमारत मा. आ. सत्यजित तांबे आणि मा. आ. देवयानी फरांदे यांच्या सक्रीय सहभागातून पूर्ण झालेली आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवार दि. ६ जुलै २०२६ रोजी सायं ४ वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठान टिळकवाडी नाशिक येथे संपन्न होत असून त्यानंतर समारंभाचा कार्यक्रम सायं. ४.३० वाजता कुसुमाग्रज स्मारक गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. मा. ना. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते वाचनालयाच्या विस्तारित इमारत लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री प्रकाश होळकर भूषविणार आहेत. या कार्यक्रमास मा. आ. सत्यजित तांबे, मा. आ. सौ. देवयानी फरांदे, मा. आ. सौ. सीमाताई हिरे, मा. आ. राहुल ढिकले, मा. खा. राजाभाऊ वाजे, महापौर मा. सौ. हिमगौरी आहेर-आडके आणि नगरसेवक व प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त श्री गुरुमितसिंग बग्गा इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे, श्रोत्यांनी या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

