
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३२२ वा दिवस

या दानशील भूमीत पहिल्या प्रकारचे दान अर्थात अध्यात्मिक ज्ञानाचे दान देण्यात, त्याचा प्रचार करण्यात आपण आपली शक्ती उपयोगात आणू या. हा ज्ञानाचा प्रसार भारतापुरताच मर्यादित न ठेवता तो जगभर केला पाहिजे ही तर आपली परंपरा आहे. भारतीय विचार भारताबाहेर गेले नाहीत असे जे म्हणतात त्यांना आपला स्वतःचा इतिहास माहीतच नाही असे म्हटले पाहिजे. जेव्हा जेव्हा जगाला आवश्यकता वाटली तेव्हा तेव्हा या अध्यात्मिकतेच्या चिरंतर प्रवाहाने अवघे जग व्यापून टाकले. राजकीय ज्ञानाचा प्रचार, प्रसार तुतारीच्या निनादाने व सैन्याच्या संचलनाने होत असेल, लौकिक व सामाजिक ज्ञान बंदुका वा शस्त्रे यांनी प्रस्तुत होत असेल, परंतु ज्याप्रमाणे दव हे न दिसता, न ऐकू येता शांतपणे पडते व गुलाबाचे ताटवे फुलविते त्याप्रमाणे अध्यात्मिक ज्ञानाचे दान शांतपणे दिले जाऊ शकते. भारताने जगाला अध्यात्मिक ज्ञानाचे हे दान वारंवार दिले आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ १४ शके १९४८
★ जेष्ठ वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. ५ जुलै २०२६
★ १९४३ थोर स्वातंत्र्यसेनानी रास बिहारी बोस यांनी “आझाद हिंद सेनेची” स्थापना केली.
★ १९९६ रहस्यकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचा स्मृतीदिन.

