
सेलू :( प्रतिनिधी ) सीबीएसई बोर्डाच्या वतीने आयोजित यंग इंडिया पाककला स्पर्धेच्या विभागीय स्तरावर बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूल, सेलू येथील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. ही स्पर्धा दिनांक २६ व २७ ऑक्टोबर २०२६ रोजी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट स्टडीज, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत शाळेचे विद्यार्थी अमेय भरडे व अथर्व शेळके यांनी सहभाग घेतला. पाककलेतील कौशल्य, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची आणि पाककला क्षेत्रातील अनुभव मिळविण्याची संधी प्राप्त झाली.
या विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्या रितू श्रीवास्तव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल व कामगिरीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा भावनाताई बोर्डीकर (मुंगसे) यांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या या सहभागामुळे शाळेच्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांत आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे.

