
नांदगाव (प्रतिनिधी )नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात दीपोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी शाळेचे अधीक्षक मा. श्री. भैय्यासाहेब चव्हाण सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता जाधव मॅडम, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ. सुवर्णा आहेर ताई तसेच माता पालक संघाच्या सर्व सदस्य यांचे उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वर्ग यांनी सरस्वती पूजन, लक्ष्मीपूजन केले. शालेय परिसरात विद्यार्थ्यांनी बनवलेले सुंदर सुंदर आकाश कंदील व छान पणत्यांनी सुंदर सजावट केली. कार्यक्रमासाठी अधीक्षक श्री.चव्हाण सरांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी पर्यावरण पूरक दिवाळी कशी साजरी करावी यासंदर्भात मार्गदर्शन केले व दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
इयत्ता 3 री मधील वंश, आर्यन, आरव, आर्या,आद्या अॅलेक्स, अमय या विद्यार्थ्यांनी ई कचरा…. याविषयीं सुंदर नाटिका सादर केली विद्यार्थ्यांना कचऱ्याची विल्हेवाट कोणत्या रंगाच्या डब्यात कोणता कचरा टाकणे याविषयावर सादरीकरण केले. नाटिका मार्गदर्शन आशा शेवरे मॅडम यांनी केले श्री. गायकवाड सर यांनी दिवाळीचे महत्त्व पटवून दिले. शाळेचे शिक्षक प्रतिनिधी श्री नारळी सरांनी सुंदर फलकलेखन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील सरांनी केले तसेच आभार प्रदर्शन नारळी सरांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना गोड लाडू देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

