
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४४० वा दिवस

आपले कार्य निराधार, गरीब, पिडीत, दुःखी, अशिक्षित अशा शेतकरी आणि कामकरी वर्गासाठी आहे. प्रथम त्यांच्यासाठी कार्य करा, तद्नंतर जर काही वेळ उरला तर सुशिक्षितांसाठी कार्य करावयाचे आहे. शेतकरी-कष्टकरी, कामगार लोकांना प्रेमाने जिकता येईल. 'प्रत्येकाने स्वतःच आपला उद्धार करून घेतला पाहिजे' हे तत्त्व सर्वं क्षेत्रांना लागू आहे. त्यांनी स्वतःच आपले कार्य करावे ह्यासाठी आपण त्यांना मदत करतो. ज्याक्षणी त्यांच्या परिस्थितीचे त्यांना आकलन होईल आणि त्यांना योग्य त्या मदतीची पूर्तता होईल, त्या क्षणी त्यांचा उध्दार होईल. गेल्या शतकात सामाजिक सुधारणेच्या ज्या चळवळी झाल्या त्यांच्यापैकी अधिकांश केवळ शोभेच्या चळवळी ठरल्या आहेत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास ९ शके १९४८
★ अश्विन वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२६
★ सिंहस्थ कुंभमेळा नाशिक २०२७ ध्वजारोहण
★ १८७५ स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन.
★ १९२० नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली.
★ १९८४ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, ‘आर्यन लेडी’ श्रीमती इंदिरा गांधी यांची त्यांच्याच शीख अंगरक्षकाकडून दिल्ली येथे गोळ्या झाडून हत्या, स्मृतिदिन.
★ १९८४ भारताचे सहावे व सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
★ संकल्प दिन.
★ जागतिक एकात्मता दिन.

