
.नाशिक (जिल्हा प्रतिनिधी -नवनाथ गायकर )—- सालाबाद प्रमाणे नाथ संप्रदायिक ‘ आदेश ‘ दिवाळी अंकाचे मराठी व हिंदी भाषेमध्ये प्रकाशन रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी श्री काळाराम मंदिरा मागील, शनि चौक जवळ, स्वाद हॉल, भाविदिशा अपार्टमेंट, पंचवटी, नाशिक येथे सकाळी १०.३० वाजता करण्यात येणार आहे. या अंकाचे संपादक गणेश जयराम मोरे यांनी केले असून या अंकाचे प्रकाशन डॉ.श्री. गजानन विठोबा बाजड- पाटील (माऊली) यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून श्री काळाराम मंदिर संस्थानचे पुजारी – नरेश जयराम पुजारी, सचिन गजानन पुजारी यासह माजी जिल्हाधिकारी रघुनाथ राठोड आदी उपस्थित राहणार आहेत. आदेश अंक प्रकाशन कार्यक्रमास सर्व नाथ समाज बांधव, नाथभक्त, नागरिक तथा वाचक यांनी उपस्थित रहावे असे गोरक्षनाथ सेवा कार्यकारी मंडळ यांनी आवाहन केले आहे.

