
लासलगाव, दि. ३१ ऑक्टोबर : नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५१ वी जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा. उज्ज्वल शेलार यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी योगदान दिलेल्या दोन्ही राष्ट्रीय नेत्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमास रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे यांच्यासह उच्च माध्यमिक विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिल गायकर, प्रा. देवेंद्र भांडे आणि सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. तसेच, या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

