
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांच्या विजयात महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
राज्याध्यक्ष किशोर दराडे व राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण यांचा अमरावतीत ठिय्या दिला त्यामुळे संघटनेच्या एकजुटीला यश आले आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांनी विजय संपादन केला. या विजयामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेने बजावलेली भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार मा. किशोर दराडे आणि राज्य उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी अमरावती येथे ठिय्या देऊन प्रचाराची धुरा सांभाळली. महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेचे अमरावती विभागाचे अध्यक्ष डॉ. दिलीप सूर्यवंशी यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. तसेच अमरावती विभागातील संघटनेची संपूर्ण यंत्रणा किरण सरनाईक यांच्या विजयासाठी सक्रिय केली ,विविध शिक्षक संघटनांच्या एकजुटीमुळे प्रचाराला मोठी ताकद मिळाली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत, नियोजनबद्ध प्रचार, शिक्षकांशी साधलेला थेट संपर्क आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम याला अखेर यश आले. संघटनेने केलेल्या प्रभावी कामाचा किरण सरनाईक यांच्या विजयात निश्चितच मोठा वाटा राहिला.
या विजयामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेची संघटनात्मक ताकद आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांची एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

